Osteoarthritis किंवा संधिवात काय आहे....समजून घेऊया...
- Dr. Mangesh hedau
- Sep 13, 2020
- 2 min read

संधिवात हा शरीरातील सांध्यामध्ये होणारा आणि खूप दिवस रेंगाळत राहणार आजार आहे. शक्यतो चाळिशीनंतर होणारा हा आजार भारतामध्ये खूपच सामान्य आहे. जवळपास 30-40% समुदाय हा संधिवाताने ग्रस्त आहे.
संधीवात कुठे होतो –

संधिवात हा शक्यतो गुडघा,कोपर, मांड्याचे संधी, मान,पाठ,कंबरेतील संधी आणि पायातील सांधे या ठिकाणी होऊ शकतो.
संधिवात होण्याचे कारण –
संधिवात होण्यामागे महत्वाचे कारण सांध्याची झीज,वजन अधिक वाढणे,चुकीचे राहणीमान, सांध्यावर किंवा त्याच्या आजूबाजूला काही आघात होणे,हे कारण असू शकते. या शिवाय प्रत्यक्ष कारण व्यक्तिनुरुप वेगवेगळे सुद्धा असू शकते.
संधिवाताचे लक्षण -
वेदना हे सर्वात मुख्य कारण आहे. चालताना,वाकताना,बसताना,उठताना सांध्यामध्ये वेदना होणे,सांधे जकडल्यासारखे वाटणे,शेकल्यावर बरे वाटणे असे लक्षणं आढलून येतात. टिपः वरील लक्षणे ही केवळ संधिवाताची सांगितलेली आहे. इतर त्यासारखे आजार जसे आमवात, गाऊट(वातरक्त) या आजारांमध्ये सुद्धा सांध्यांमध्ये वेदना असतेच,मात्र इतर वेगळी लक्षणे सुद्धा असतात.
संधिवाताचा उपचार -
संधिवाताचा उपचार दोन पद्धतीने करता येतो
१.आधुनिक शास्त्राप्रमाणे २.आयुर्वेद शास्त्रानुसार आपण दोंहिविषयी थोडक्यात चर्चा करू.
१.आधुनिक शास्त्रानुसार –
आधुनिक शास्त्रामध्ये उपचार करत असताना मुख्य भर हा वेदना कमी करणे यावर असतो. वेदना कमी करण्यासाठी औषधे सतत घ्यावयाची असतात. व्हिटॅमिन चा वापरावर मुख्य भर असतो. ही औषधे वर्षानुवर्षे घ्यावी लागतात. कालांतराने किंवा खूप वेदना असल्यास ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला जातो. २.आयुर्वेद शास्त्रानुसार - आयुर्वेदानुसार या आजारांमध्ये वाताचे किंवा कफवाताचे आधिक्य असते.आयुर्वेदात संधीवात मुळातून नष्ट होऊ शकतो.औषधे काही महिने घेणे आवश्यक असते. तसेच पथ्य पालन सुद्धा आवश्यक असते. आयुर्वेदानुसार संधिवात होण्याचे खूप कारणं आहेत, ती शोधण्याचा प्रयत्न केला जातो. उदा. कीटक दंश,मधुमेह, बाळंतपणामध्ये योग्य ती काळजी न घेणे, वातुळ आहाराचे अतिसेवन,मानसिक त्रास,लघवीचा त्रास,व्यायाम न करणे, सांध्यातील रक्त दूषित असणे यासारखी कारणे संधिवात निर्माण करू शकतात. त्याचे निदान करणे व त्यानुसार चिकित्सा केल्या जाते.
आयुर्वेदिक उपचारामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो - औषधी योजना - योग्य निदान करून त्यानुसार करणे, लेप लावणे- लेपाचे भरपूर प्रकार आहेत. निदान करून लेप कोणता लावायचा ते ठरवायचे असते. जळवा लावणे - यामुळे सांध्याच्या ठिकाणी जमा झालेले खराब रक्त बाहेर काढल्या जाते. पुर्णतः नैसर्गिक पद्धतीने केले जाते. या उपचाराने सांध्यातिल वेदना तत्काळ कमी यायला लागतात. तेलाने अभ्यंग करणे व औषधी शेक सुवर्ण असलेले औषध वापरणे. यांना सुवर्णकल्प म्हणतात.सुवर्णकल्पामुळे वेदना काहीही उपद्रव न होता लवकर कमी होतात. सांध्याची झीज भरून येण्यास मदत करतात,तसेच शरीराला सुदृढ करतात व इतर काही गुप्त त्रास असल्यास ते सुद्धा कमी होऊन शरीर स्वस्थ होण्यास मदत करतात.
श्री शाश्वत आयुर्वेद- पंचकर्म ,अमरावती येथे संधिवात, आमवात, गाऊट यांसारख्या आजारावर उत्तम चिकित्सा उपलब्ध आहे. १०-१२ वर्षाचा अनुभव आणि उत्कृष्ठ व सिद्ध औषधी वापर यामुळे रुग्णाला पहिल्या दिवसापासूनच आराम व्हायला लागतो. सतत वाढणारी झीज रुग्णाचा त्रास सतत वाढवत असते म्हणून संधिवातावर उपचार लवकरात लवकर करणे कधीही हिताचे ठरते.
अधिक माहितीसाठी संपर्क करा.
श्री शाश्वत आयुर्वेद - पंचकर्म चिकित्सालय गेलेक्सी हॉस्पीटल जवळ, दरोगा प्लॉट, गोपाल टॉकीज रोड, अमरावती. फोन नंबर - 9970334125 8208709858