मणक्याचे व गुडघ्याचे आजार यावर मात करा
- Dr. Mangesh hedau
- Dec 23, 2023
- 2 min read
हाडे व सांधेदुखी प्रामुख्याने तीन कारणामुळे होतात,
1.हाडाची - सांध्याची ,मणक्याची झीज झाल्यामुळे
2.संध्यामध्ये चिकट पदार्थ किंवा अत्यंत घट्ट पदार्थ अतिप्रमाणात जमा झाल्यामुळे
3.नस दबणे, गॅप निर्माण होणे,मणक्यातून
आयुर्वेदानुसार हे वाताचे किंवा वातरक्ताचे आजार म्हणून गणल्या जातात.
हे आजार होण्याचे कारण आघात,पोटाचे आजार,अपचन,सारखे शिळे अन्न खाणे,खूप चालणे,वजनवाढ,सोरायसिस सारखा त्वचेचा आजार,मधुमेह,डिलिवरी नंतर मालीश - शेक - तूप आवश्यक प्रमाणात न घेणे यासारखी कारणे असू शकतात.
वरील कारणामुळे सांध्याच्या वेदना तर निर्माण होतातच शिवाय,उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल प्रमाण विकृती,मधुमेह,मायग्रेन यासारखे अन्य आजारेसुद्धा निर्माण होऊ शकतात.शिवाय यातील एकाला तुम्ही पेनकीलर घेऊन दाबायचा प्रयत्न केल्यास दुसरा किंवा तिसरा नवीनच व्याधी निर्माण होऊ शकतो.
उपचार काय असू शकतो.. शिळे खाणे बंद करावे,स्वतःची भूक तपासा..गरज नसल्यास सायंकाळचे जेवण कमी करा.
याबरोबर,
योग्य निदान करून कारण लक्षात आले की त्यादृष्टीने उपाय योजना करून मणक्याच्या, हाडाचे व सांध्याच्या वेदना दीर्घकाळासाठी आटोक्यात आणणे सहज शक्य आहे.
तसेच सांध्याची झीज झाली असल्यास त्या त्या सांध्याच्या ठिकाणी औषधी तेल विशिष्ट पद्धतीने भरून ठेवल्यास व याच्या जोडीने बस्ती घेतल्यास (पंचकर्म) खूप चांगला आराम पडतो.
याशिवाय, अग्नीकर्म करणे, विद्ध किंवा जलोका लाऊन खराब रक्त व वायु बाहेर काढणे यामुळे तत्काळ वेदना कमी होतात. उगाच पेनकीलर च्या गोळ्या सारख्या खायची गरज पडत नाही व किडनी व लिव्हर खराब होण्याचा धोका टळतो.
विशेषतः शस्त्रक्रिया [ Operation ] करायची अजिबात गरज पडत नाही.

बहुतेक रुग्णांना शस्त्रक्रिया हाच एकमेव उपाय आहे, हा भ्रम झालेला असतो. पेनकीलर खाऊन खाऊन थकले की डॉक्टर सुद्धा शस्त्रक्रियेचा अंतिम उपाय त्यांच्या समोर ठेवतात. मग हतबल झालेला रुग्ण ऑपरेशन करून मोकळा होतो. मात्र हे इथेच थांबत नाही. खरी गोची पुढे आहेच. त्यांना मग खाली बसता येत नाही,पाय जवळ घेत येत नाही,अडीनाडीला कधी धावण्याची वेळ आलीच तर तेही जमत नाही...मग ऑपरेशन करून फायदा काय झाला? मान्य आहे दुखणे बंद झाले...पण यालाच उपचार म्हणतात का?
उत्तर इतरत्र उपलब्ध आहे. आयुर्वेद हा वार्धक्याचा परिणाम कमी करू शकतो. गुडघा व मणक्याच्या कूर्चा व स्नायू यांना बलवान करण्यासाठी त्याच्या मुळाचे पोषण होणे गरजेचे आहे. झाडाच्या फांद्याना पाणी दिल्याने झाड वाढत नाही..ते मुळानाच द्यावे लागते 😊. त्याचे मूळ कुठे आहे हे आयुर्वेद जाणतो आणि त्याचा उपचार देखील. त्यामुळे ऑपरेशनचा सल्ला दिला असल्यास... नाही म्हणणे यात चुकीचं काही नाही.

किंवा आयुर्वेद याबाबत काय सांगते तेहि समजून घ्या.
आयुर्वेद उपचार करून घ्या.
शाश्वत आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, अमरावती येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे...लाभ घ्या. उपचार करा व निरोगी व्हा.🙏

खालील नंबरवर अधिक माहितीसाठी संपर्क करा -
8208709858
8421718780
शिबिर स्थळ -
*डॉ. मंगेश ना. हेडाऊ*
आयुर्वेदाचार्य BAMS ,DYA(Pune),पंचकर्मतज्ञ, नाडीतज्ञ
*डॉ. शुभांगी हेडाऊ (क्षीरसागर)*
आयुर्वेदाचार्य BAMS ,DYA(Pune),पंचकर्मतज्ञ
*श्री शाश्वत आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक*
मशानकर हॉस्पिटलजवळील ग्राउंडच्या बाजूला ,
स्टेशन ते गोपाल टॉकीज रोड , राजापेठ अमरावती
8208-70-9858
8421-71-8780
दवाखान्याची वेळ -
सकाळी 10:30 ते दुपारी 2 :30
6:00 ते 9:00
टीप - दवाखाना दररोज सुरू असतो.
댓글